लोकदर्शन नांदेड👉 (प्रतिनिधी):
राज्य परिवहन कार्यालय, नांदेड येथील कामगार अधिकारी लक्ष्मीकांत विठ्ठलराव गवारे यांच्याविरोधात लाच मागणीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड युनिटने कारवाई सुरू केली आहे. तक्रारदार (वय ५५ वर्षे) यांच्याविरुद्धच्या विभागीय चौकशीत शिक्षा कमी करून दिल्याच्या मोबदल्यात गवारे यांनी ७,००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २ मे २०२५ रोजी प्राप्त झाली होती.
लाच मागणी पडताळणी व सापळा कारवाई:
८ मे २०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी गवारे यांनी, विभागीय वाहतूक अधिकारी क.बा. भारती यांच्यासाठी लाचेची रक्कम असल्याचे सांगून ७,००० रुपये मागितल्याचे स्पष्ट झाले.
परंतु १६ मे, २ जून आणि १७ जून रोजी सापळा कारवाया केल्या असता आरोपीने रक्कम स्वीकारलेली नाही. अखेर २३ जून रोजी पुन्हा सापळा लावण्यात आला, मात्र त्यावेळीही लाच स्वीकारलेली गेली नाही.
गुन्हा दाखल आणि पुढील तपास:
लोकसेवक गवारे यांच्याविरुद्ध पो.स्टे. भाग्यनगर येथे गु.र.नं. 356/2025, कलम 7A भ्र.प्र. अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटकेत नाहीत, मात्र त्यांच्या राहत्या घराची झडती सुरू आहे आणि ताब्यात घेण्यासाठी तजवीज सुरू आहे.
संपूर्ण कारवाईचे नेतृत्व आणि पथक:
सापळा व तपास अधिकारी: श्री. गजानन बोडके, पोलीस निरीक्षक
सापळा पथक सदस्य:
पोहेकॉ राजेश राठोड, वच्चेवार, पोकॉ सय्यद खदिर, ईश्वर जाधव, चापोना प्रकाश मामुलवार
मार्गदर्शक अधिकारी: श्री. संदीप पालवे (पोलीस अधीक्षक), डॉ. संजय तुंगार (अपर पोलीस अधीक्षक)
पर्यवेक्षण अधिकारी: श्री. प्रशांत पवार (पोलीस उपअधीक्षक)
संपर्क:
टोल फ्री क्रमांक: 1064
दूरध्वनी: 02462 253512
🛑 भ्रष्टाचाराविरुद्ध जनतेचा सजग सहभाग हाच मुख्य शस्त्र!
–