लोकदर्शन मुंबई,परेल 👉- गुरुनाथ तिरपणकर):
आर्यारवी एंटरटेनमेंटच्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर, संस्थेने पहिल्यांदाच “कलाकार बॉक्स क्रिकेट लीग – 2025” चे भव्य आयोजन केले. परेल येथील क्रिकमेनिया ग्रीनलँड टर्फ मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सन्माननीय डॉ. कौतिक दांडगे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.
या कार्यक्रमाला महेश्वर तेटांबे, सुशांत साळुंखे, राजवीर जाधव, अनंत सुतार, रमेश यादव सर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कलावंत उपस्थित होते. हि लीग खास नाटक, मालिका, सिनेमा, दूरदर्शन व एकांकिकेत कार्यरत कलावंतांसाठी आयोजित करण्यात आली होती.
सहभागी संघ:
साठेची कार्टी
सिने डान्सर
मोरया
कर्टन कॉल
ॐ साई प्रॉडक्शन
भावकादेवी प्रॉडक्शन
स्वामी समर्थ कलामंच
के स्टार
स्पर्धेतील अंतिम विजेता ठरला “सिने डान्सर” संघ, ज्यांनी कै.भिकाजी महादेव तेटांबे व कै.मनोरमा तेटांबे यांच्या स्मरणार्थ प्रथम विजेतेपद पटकावले. उपविजेता ठरला “मोरया” संघ, ज्यांना कौतिक दांडगे सौजन्य पुरस्कार देण्यात आला.
विशेष पारितोषिके:
मॅन ऑफ द मॅच (16) : लोकनेते कै. विठ्ठलदादा खाडे आणि कै. सुनीताताई यांच्या स्मरणार्थ
मॅन ऑफ द सिरीज : कै. गीता आनंदा जाधव स्मरणार्थ
उत्कृष्ट फलंदाज / गोलंदाज / क्षेत्ररक्षक : कै. शामराव व कै. हौसाबाई व्हटकर यांच्या स्मरणार्थ
या आयोजनासाठी माधुरी मांजरेकर, डॉ. साजिदा अत्तर, मनीष पाथरे, खलील शिरगांवकर, दिलीप कराड, शैलेश काळे, कुशल धुरी यांसह अनेक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.
आर्यारवी एंटरटेनमेंटची ही पहिली कलाकार बॉक्स क्रिकेट लीग खेळीमेळीच्या, स्पर्धात्मक आणि सांघिक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.