निलेश ताजने यांच्या जन्मदिना निमित्त ‘गडचांदुर गौरव सोहळा ‘ : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार

By : Shankar Tadas
गडचांदूर : मानवदेहामध्ये नानाविध कलागुणांचा आविष्कार होत असतो. प्रतिभावंत व्यक्ती स्व-कर्माने अंतरंगात असलेल्या प्रतिभेला योग्य वेळी व्यक्त करीत असतात. हीच बाब अंगीकृत केलेल्या गडचांदुर नगरा च्या उद्योग क्षेत्रात भरारी घेतलेल्या निलेश ताजने या ध्येयवेड्या तरुणाला तंतोतंत लागू होते. अनेक सामाजिक तथा धार्मिक उपक्रमात ते अग्रभागी असतात. दिनदुबळ्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणूनही ते सर्वश्रुत आहेत. निलेश ताजने यांचा अभिष्टचिंतन सोहळा गडचांदुर येथील भाऊराव पाटील आश्रम शाळा परिसरात नाविन्यपूर्ण उपक्रमानी साजरा करण्यात आला. यावेळी भागातील प्रगतीशील व प्रयोगशील शेतकरी, प्रभावी महिला बचत गट, प्राविण्यप्राप्त विद्यार्थी तसेच आदर्श शिक्षक यांचा सत्कार यानिमित्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माजी आमदार ऍड. संजयभाऊ धोटे, भाजपा नगर जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ कासनगोट्टुवार, प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष महेश देवकते, सतीश धोटे, भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण मस्की, डॉ.अंकुशजी गोतावळे, युवा नेतृत्व आशिष देवतळे, अनय जयस्वाल, शेतकरी नेते आबिद अली, बलराम डोडाणी, तुषार सोम,सुरेश केंद्रे, शिवाजी शेलोकर, रामसेवक मोरे, संदीप शेरकी, महादेव जयस्वाल, दिलीप वांढरे, संदीप गायकवाड, रवी गुरूनुले,ॲड.अर्पित धोटे,दशरथ सिंह ठाकुर,महादेव तपासे, आशिष चव्हाण, संदीप पारखी, सचिन शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारत माता आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रास्ताविकात हरीशचंद्र थिपे गुरुजी यांनी निलेश ताजने यांचे संघर्षमय जीवन रेखाटले.
जीवन जगण्याची कला माणसाला संघर्ष शिकवीत असतो. माझेही जीवन संघर्षमय होते. नीलेशभाऊ आपण क्षेत्रातील उभरते नेते आहात. समोर आपणास जनसेवेसाठी अविरत प्रयत्न करायचे आहे. चंद्रपूर शहरात अम्मा का टिफीन माध्यमातून दररोज ३५० लोकांना भोजण मिळतय आणि याच स्तुत्य उपक्रमातून मला आशीर्वादाची पावती मिळते. ही माझी खरी कमाई आहे.आपणही मागिल तन वर्षापासून दीनदुबळ्यांच्या सेवेत तत्पर असता. ही स्तुत्य बाब आहे. आई महाकाली आपल्या पाठीशी आहे. तुम्ही अविरत जनसेवा करीत रहा, असे संबोधनात आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. ऍड. संजय धोटे यांनी निलेश ताजने यांच्यातला सकारात्मक भाव विशद करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत निलेश ताजने यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
निलेश ताजने यांनी मनोगत व्यक्त करताना जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या गडचांदूरची सेवा विविध माध्यमातून करीत आलो आणि यापुढे ही करीत राहणार असल्याचे सांगितले. राजकारण माझा पिंड नाही.स्पष्ट वक्ता असल्याने अडचणी फार येतात.परंतु त्यावरही मात करून जनसेवेचा व्रत मी अविरत अंगीकारून दीनदुबळ्यांच्या सेवेत रममाण होत राहील. येणाऱ्या काळात ग्रीन गडचांदूर योजना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या सर्व हितचिंतक बांधवांसमवेत जनकार्य करण्यास मी सदैव तत्पर राहीन, असा संकल्प यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी प्रगतीशील शेतकरी हरिभाऊ थिपे, बंडु थेरे, संजय मेंढी, शंकर उरकून्डे, सोनडवले, मंगेश लोहे,साईनाथ कुंभारे, अंकुश धाबेकर, प्रफुल मालेकर यांचा शेती कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. सोबतच गुणवंत विद्यार्थी, प्रभावी महिला बचत गट, उत्कृष्ट शिक्षक वृंद यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिवती,राजुरा, कोरपणा तालुक्यातील तीन हजार पेक्षा जास्त बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मंथनवार व स्नेहा काकडे यांनी केले.आभार प्रदर्शन सपना शेलोकर यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीते साठी श्रीतेज फाऊंडेशन, निलेश ताजने मित्र परिवार यांनी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here