🖊️ लोकदर्शन न्यूज|प्रतिनिधी चंद्रपूर👉 शिवाजी सेलोकर
राज्य शासनाच्या सेवेत अनुकंपा तत्त्वावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना (OPS) लागू करावी, अशी ठाम मागणी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज (दि. १४ जून २०२५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या महत्त्वपूर्ण पत्राद्वारे केली आहे.
पत्र क्रमांक ५४३/२०२५ द्वारे त्यांनी नमूद केले आहे की, केंद्र शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा तत्त्वावर जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा.
🔍 काय आहे मुद्दा?
खासदार धानोरकर यांच्या मते,
📌 १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सरळ सेवा प्रवेशाने रिक्त जागांवर अनुकंपा तत्त्वावर निवड झालेल्या, परंतु त्यानंतर प्रत्यक्ष सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे.
📌 वित्त विभागाने ०२ फेब्रुवारी २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयात या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.
🗣️ वरोरा येथे कर्मचाऱ्यांची भेट
आज वरोरा येथे अनुकंपा पेन्शन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रतिभाताईंची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी
गुरुदास गुरनुले, नितीन साखरे, वीरेंद्र पिल्लेवान, हरीश मांढरे, नितीन उमरे, गजानन बोरकुटे आदींची उपस्थिती होती.
📩 मुख्यमंत्र्यांना सुचवलेले निर्णय
🔹 केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही OPS लागू करण्याचा निर्णय घ्यावा
🔹 १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा
🔹 शासनाच्या धोरणात्मक निर्णयात ही बाब अंतर्भूत करावी
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे की, “अनुकंपा तत्त्वावर सेवा स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, ही केवळ कायदेशीर बाब नाही तर माणुसकीचाही विषय आहे.”
त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
—
📍 लोकदर्शन न्यूज पोर्टल
✍️शंकर तडस/ मोहन भारती