लोकदर्शन. गडचांदूर 👉 मोहन भारती
गडचांदूर : सिंदीकेट युवा मंच, गडचांदूर यांच्या वतीने विधानसभा क्षेत्राचे लाडके व लोकाभिमुख आमदार मा. श्री. देवरावजी भोंगळे यांचा भव्य नागरी सत्कार, गुणवंत विद्यार्थी गौरव तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १४ जून २०२५, शनिवार रोजी सायंकाळी ६.०० वाजता गांधी चौक, गडचांदूर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमात मा. आमदार देवराव दादा भोंगळे यांच्याच हस्ते सत्कार समारंभाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष:
🔷 मा. हंसराजजी चौधरी – अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, गडचांदूर
प्रमुख उपस्थित मान्यवर:
🔸 मा. शिवाजी कदम – ठाणेदार, गडचांदूर
🔸 मा. आशिष चव्हाण – मुख्याधिकारी, नगरपरिषद गडचांदूर
🔸 मा. महादेवराव एकरे – सामाजिक कार्यकर्ता व प्रगतशील शेतकरी
🔸 मा. अतुलजी कन्सल – युनिट हेड, अल्ट्राटेक सिमेंट गट
कार्यक्रमामध्ये स्थानिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांतून स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
सिंदीकेट युवा मंच व यांच्या वतीने गडचांदूरवासीयांना आवाहन करण्यात आले आहे की, या भव्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकप्रतिनिधींचा गौरव व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा.
कार्यक्रम आयोजक मंडळी – सिंदीकेट युवा मंच, गडचांदूर
👉 रोहन काकडे, रोहित शिंगाळे, महादेव हेपट, पवन राजूरकर, दीपक वरभे, रुपेश चौधरी, गणेश सातपाडे, किटू जयस्वाल, प्रणित आहेरकर, पवन ताजने, अंकुश घाटोळे व मित्रपरिवार
📍 स्थळ: गांधी चौक, गडचांदूर
📅 दिनांक: १४ जून २०२५ (शनिवार)
🕕 वेळ: सायंकाळी ६.०० वाजता
—
(लोकदर्शन प्रतिनिधी – मोहन भारती)
—