गोरगरिबांच्या मदतीसाठी तत्पर असलेले राजेंद्र भगत समाजाचे खरे पाईक – काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे गौरवोद्गार

लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे

लोकदर्शन न्यूज पोर्टल – उरण, दि. ५ (विठ्ठल ममताबादे)

गोरगरिबांपासून ते आदिवासी बांधवांपर्यंत समाजातील वंचित घटकांच्या गरजेनुसार मदतीचा हात देणारे आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे राजेंद्र भगत हे खरे समाजाचे पाईक आहेत, असे गौरवोद्गार काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी काढले.

उरणमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान उरण विधानसभा युवक इंटकचे अध्यक्ष राजेंद्र जगन्नाथ भगत यांची भेट घेत असताना, जिल्हाध्यक्ष घरत यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

राजेंद्र भगत यांनी अलीकडेच एका कॅन्सरग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत केली असून, एका पॅरालिसिसग्रस्त कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाच्या अनुपस्थितीत संपूर्ण कुटुंबाला एक महिन्यापुरते जीवनावश्यक साहित्य पुरवले. त्यांच्या या उपक्रमामुळे संबंधित कुटुंबाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले.

महेंद्र घरत व राजेंद्र भगत यांचे अतिशय जवळचे व स्नेहाचे संबंध आहेत. घरत साहेबांना आदर्श मानत, राजेंद्र भगत देखील सामाजिक भान ठेवून आपल्या कुवतीनुसार सामाजिक कार्य करताना आढळतात.

राजेंद्र भगत हे दरवर्षी गोरगरिबांना मांसाहारी जेवणाचे वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वृक्ष लागवड मोहीम, आदिवासी समाजाच्या अडचणी समजून त्यांना आवश्यक ती मदत अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात.

त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे युवकांमध्ये एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून, राजेंद्र भगत यांच्यासारखे कार्यकर्ते म्हणजे समाजासाठी आधारस्तंभच आहेत, असे उद्गार जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी व्यक्त केले.

अधिक माहिती व बातम्यांसाठी वाचा – लोकदर्शन न्यूज पोर्टल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here