लेक माहेरचा कट्टा गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला

लोकदर्शन न्यूज प्रतिनिधी :👉 महेश कदम, मुंबई

पुणे | बावधन येथील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन कॉलेज येथे लेक माहेरचा कट्टा (माझी भरारी) गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे पर्वत चौथे अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० पेक्षा अधिक महिलांचा “नारी रत्न गौरव पुरस्कार” देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन लेक माहेरचा कट्टा संस्थेच्या संस्थापिका सारिका ढाणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. “लेक माहेरचा कट्टा” हे एक महिला सक्षमीकरणासाठीचे सामाजिक डिजिटल व्यासपीठ असून, १२ लाखांहून अधिक महिलांचे डिजिटल नेटवर्क या माध्यमातून कार्यरत आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी रोजगार, वैद्यकीय मदत, कायदेशीर सल्ला, मानसिक आरोग्य, प्रशिक्षण आणि प्रेरणा हे मुख्य उद्दिष्ट असून, आजवर हजारो महिलांना याचा फायदा मिळाला आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते –
डॉ. नारायण जायभाये, हनुमंतराव गायकवाड, जयमाला इनामदार, डॉ. संजय चोरडिया, सौ. सुषमा चोरडिया, संतोष साळुंके, उज्वला मेश्राम, राहुल खिचडी, संगीता जुमडे, तेज पंचाल आदी.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले, तर स्वागत, संयोजन व नियोजनामध्ये अँडमिन, एलएमके लीडर्स आणि सहायक कार्यकर्त्यांचा मोठा वाटा होता.

पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये –
स्वप्ना कुंभार देशपांडे (शिक्षिका, निवेदिका), यशोदा पाटील (शिवव्याख्याता), दिपाली राणे, शुभांगी देशमुख, उर्मिला बोरसे (ज्योतिषी), सोनाली बंडगर, आरती बनसोडे (समुपदेशक), अर्चना राजपूत, प्राजक्ता आसरकर, जयश्री सोनटक्के, डॉ. मनोती तळवलकर (मानसोपचार तज्ञ), निकिता कुलकर्णी (कोचिंग संचालिका), संगीता बांदल (वकिल), दर्शना चव्हाण, मिनल शेळके, मंगला दोरीक, रिती सावंत, रश्मी बोराडे, दिव्यानी कोळेकर, स्वाती कदम, मनिषा शिंदे, मंजुषा फुलारी, शितल बुले, अश्विनी डगवार, उर्मिला छाजेड, रुपाली राजपूत, कांचन कोळी, रेश्मा गायकवाड, जयश्री मोनंदा (झुंबा ट्रेनर) आदींचा समावेश होता.

पत्रकार क्षेत्रातील गौरव –
संतोषी जगदाळे, तात्या गवळी, मुबा खतीब, लक्ष्मण शिंदे, वसंत सोनवणे, बाप्पा भांगे, गणेश देशमुख, महेश कदम, तुषार नेवरेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी –
विशाल पांचाळ, सोनाली चौधरी, भागवत मुंडे, गौरव भांगे, अशोक काळकुटे, उदय साबळे, श्रीराम क्षीरसागर यांना गौरवण्यात आले.

सारिका ढाणे यांचे कार्य –
२०१७ साली फेसबुक पेजपासून सुरुवात करून, आज ‘लेक माहेरचा कट्टा’ या मंचाने महिलांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण केले आहे. कोविड काळात महिलांना वैद्यकीय मदत, ऑनलाइन व्यवसायाची संधी, आणि प्लाझ्मा, इंजेक्शन, बेड व्यवस्थापनात महत्त्वाचे योगदान दिले. याच कार्याची दखल घेत डेटॉल इंडिया ने त्यांचा फोटो कोविड योद्धा म्हणून आपल्या बॉटलवर छापला होता.

आज, लेक माहेरचा कट्टा हे महिलांसाठी एक सशक्तीकरणाचे प्रतीक बनले असून, विविध उपक्रम, सहली, मॅरेथॉन, कार रॅली, हेल्थ कॅम्प्स, बिझनेस एक्झिबिशन यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढीस लागला आहे.

सारांशतः, महिलांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील स्त्रियांचा सन्मान करून, “लेक माहेरचा कट्टा” ने नारी शक्तीला उजाळा दिला आहे.
लोकदर्शन न्यूज पोर्टल
(महेश कदम, प्रतिनिधी – मुंबई)
📍 बावधन, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here