पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे गोंडवाना विद्यापीठात भव्य उदघाटन लोकदर्शन नगडचिरोली 👉 मोहन भारती

लोकदर्शन नगडचिरोली 👉 मोहन भारती

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशती जन्मशताब्दी समारोह समारोप” प्रसंगी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे भव्य उदघाटन दिनांक ३१ मे २०२५ रोजी शनिवार, दुपारी ४ वाजता चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात संपन्न होणार आहे.

या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. रविंद्र भागवत (चंद्रपूर), प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, डॉ. मंगेश गुलवाडे (अध्यक्ष, त्रिशती समिती) व गुरुदास कामडी (सदस्य, व्यवस्थापन परिषद-अधिसभा) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून नागपूरच्या वीर रस कवयित्री श्रद्धा मौर्य यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, अभ्यासक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या अध्यासन केंद्राच्या स्थापनेमागचा उद्देश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे आणि कार्याचे अध्ययन, संशोधन व प्रसार करणे हाच असून, त्या महान स्त्रीशक्तीच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हे एक मोलाचे पाऊल ठरणार आहे, असे गुरुदास कामडी यांनी नमूद केले.

उद्घाटन समारंभासाठी सर्व नागरिकांना मन:पूर्वक आमंत्रित करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here