उरण : भारतीय सेनेच्या सन्मानार्थ काँग्रेसची भव्य तिरंगा रॅली

लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे

उरण, दि. २१ मे २०२५ (प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे) – भारतीय सेनेच्या सन्मानार्थ उरण शहरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. बुधवार (ता. २१) रोजी आयोजित केलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रॅलीची सुरुवात उरण काँग्रेस कार्यालयातून भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादनाने झाली. यानंतर महेंद्रशेठ घरत यांनी कार्यकर्त्यांसह महात्मा गांधी अर्धपुतळा व हुतात्मा चौक येथे पुष्पांजली अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, “भारतीय सैनिकांचा विजय असो” अशा घोषणा देत रॅली उरण शहरभर फिरली.

रॅलीदरम्यान बोलताना महेंद्रशेठ घरत यांनी भारतीय लष्कराच्या कार्याची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, “भारतीय लष्कराच्या मजबुतीसाठी इंदिरा गांधींनी १९८३ मध्ये ‘इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम’ सुरू केला. पुढे राजीव गांधी आणि मनमोहनसिंग सरकारच्या काळात संरक्षण यंत्रणेचा विकास झाला.” त्यांनी लष्करात महिलांना संधी दिल्याचा माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांचा ऐतिहासिक निर्णयही अधोरेखित केला. “भारतीय लष्कराच्या शौर्यामुळेच पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणे शक्य झाले,” असेही ते म्हणाले.

या रॅलीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, माजी जि.प. सदस्य महेंद्र ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, महिला तालुका अध्यक्ष रेखा घरत, शहर महिला अध्यक्ष अफशा मुकरी, शहराध्यक्ष गुफरान तुंगेकर, तसेच जयवंत पाटील, संजय ठाकूर, दिपक ठाकूर, गोपीनाथ मांडीळकर, भालचंद्र घरत, प्रेमनाथ ठाकूर, हेमंत ठाकूर, प्रमोद ठाकूर, वैभव पाटील, लंकेश ठाकूर, ध्रुव पाटील, तेजस पाटील, सदानंद पाटील, विनया पाटील, निर्मला पाटील, प्रतीक्षा पाटील, अमिना पटेल, जयवंती गोंधळी, जगदीश घरत, प्रफुल घरत, अशोक ठाकूर, आदित्य घरत, श्रीयश घरत, विनोद पाटील, घनश्याम पाटील, आनंद ठाकूर, विवेक म्हात्रे, किरण कुंभार, अरुण म्हात्रे, जितेश म्हात्रे, रमेश टेमकर, दत्ता म्हात्रे आदी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— गेट न्यूज, उरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here