लोकदर्शन मुंबई 👉वसंत उटिकर
मुंबई – सचिवालय जिमखाना, मुंबई येथे सोमवार, दिनांक १९ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व कला स्पर्धा (२०१९-२० ते २०२४-२५) मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंना आणि कलाकारांना सन्मानित करण्यात आले.
या भव्य गुणगौरव समारंभाचे उद्घाटन मा. श्रीमती सुजाता सौनिक, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी विविध वरिष्ठ शासकीय अधिकारी व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात वस्तू व सेवा कर कार्यालयात दूरध्वनी चालिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती नेहा नलिन पावसकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी गेल्या सहा वर्षांत विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवत राज्याचे नाव उज्वल केले आहे.
अखिल भारतीय बुद्धिबळ महिला संघात महाराष्ट्राला प्रथमच ब्रॉन्झ मेडल मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच सन २०२१ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना “रोल मॉडेल” म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
श्रीमती पावसकर या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धक, मैदानी खेळ व गोलबॉल खेळाडू, राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक असून शिवछत्रपती पुरस्कार (गिर्यारोहण) प्राप्त करणाऱ्या दुर्मीळ गुणवंतांपैकी एक आहेत. पार्शल दिव्यांग असतानाही त्यांनी आपल्या आत्मविश्वास व जिद्दीच्या बळावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील यश संपादन केले आहे.
त्यांचा दूरध्वनी क्रमांक : ९८२१५८४४३६
कार्यालय : GST कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई