राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अंध-दिव्यांग कर्मचारी नेहा पावसकर यांची व्यथा — ३५ वर्षांच्या सेवेनंतरही पदोन्नती नाही!

लोकदर्शन मुबंई 👉 वसंत उटीकर

मुंबई : जीएसटी विभागात १९९१ पासून कार्यरत आणि दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळवलेली अंध-दिव्यांग दूरध्वनी चालक श्रीमती नेहा नलिन पावसकर यांनी आपल्या सेवाकाळातील अन्यायकारक वागणुकीविरोधात मोकळेपणाने व्यथा मांडली आहे.

१९९२ साली गिर्यारोहणात विक्रम रचलेली आणि विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची मानकरी असलेल्या पावसकर यांनी आजतागायत एकही वेतनवाढ किंवा पदोन्नती मिळालेली नाही. २०१० मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि २०२१ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरव झाल्यावरही त्यांच्या योगदानाची दखल कार्यालयाने घेतलेली नाही.

त्यांनी सर्वोच्च न्यायालयात यश मिळवल्यावरही अद्याप त्यांच्या पदोन्नतीबाबत निर्णय झालेला नाही. अपंगत्व, मातृत्व गमावल्याचा आघात, विनावेतन रजा, आणि नियमानुसार असणाऱ्या सवलती न मिळणे अशा अनेक समस्यांना तोंड देत त्यांनी सामाजिक आणि खेळ क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे.

श्रीमती पावसकर यांनी आता सरकारकडे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे आपल्या कर्तृत्वाची योग्य दखल घेऊन पदोन्नतीसह सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती मिळवून देण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here