*गोंडवाना विद्यापीठात ‘पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर अध्यासन सुरू करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना सादर* *♦️अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी यांचा प्रस्ताव*

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर – गोंडवाना विद्यापीठात गडचिरोली अधिसभा (सिनेट) दिनांक २४ डिसेंबर २०२४ व दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झालेल्या अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य
गुरदास कामडी यांनी ,”पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर अध्यासनाचा प्रस्ताव अधिसभेत मांडला . या प्रस्तावाला डॉ. संजय गोरे,प्रशांत दोंतुलवार, संजय रामगिरवार,प्रा.धर्मेंद्र मुनघाटे यांनी अनुमोदन दिले. सदर प्रस्ताव अधिसभेने पारित केल्या नंतर अध्यासन सुरू करण्यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव प्रस्तावक गुरुदास कामडी यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना सादर केला.यावेळी अधिसभा सदस्य सौ.किरण गजपुरे,प्राचार्य डॉ. सदानंद बोरकर,महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, झाडीबोली साहित्यिक डॉ. धनराज खानोरकर,संजय गजपूरे उपस्थितीत होते.
ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर. सर्वधर्मसमभाव ,अस्पृश्यता उच्चाटन ,सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क ,प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशती जन्मशताब्दी देशभर साजरी केली जात आहे. याच पर्वावर हे अध्यासन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव गुरुदास कामडी यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेत सादर केला.
सर्वधर्मसमभावाचा आदर्श मिरवीत मंदिरे ,गरुद्वार व विहारे बांधली. तर काही मंदीरांचा जीर्णोद्धार केला. स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जातीभेदाला तडा दिला. अहिल्याबाई ह्या समाजसुधारक होत्या. अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक, लोकमाता व राष्ट्रमाता होत्या. असे अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी प्रस्तावाची भुमिका मांडताना सांगितले.
निमित्त दिनांक ३१ मे २०२५ जयंती पर्वावर पुण्यश्लोक अहिंल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे उदघाटन करण्याचा मानस व्यक्त केला. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशती जन्मशताब्दी सांगता समारोह निमित्त त्यांच्या कार्याला व विचाराला विनम्र अभिवादन करण्याच कार्य, तसेच महिला सशक्तीकरणासाठी विविध उपक्रम,प्रशिक्षण. महिला सुरक्षा व स्वाभिमान चालना देण्याचे कार्य या अध्यासनाच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठाला मिळणार आहे. असे ही गुरुदास कामडी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here