By : Shankar Tadas
कोरपना : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनात कोरपना तालुका विमाशिसंच्या कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले. गडचांदूर येथे लोकशाही पद्धतीने तालुका कार्यकारणीची निवड करून घोषणा करण्यात आली. सभेच्या अध्यक्ष स्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रतिय सरकार्यवाह तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले हे होते विमाशिसंचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष आनंद चलाख हे निवडणूक निर्णय अधिकारी होते, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महामंडळाचे सहकार्यवाह जगदिश जुनगरी, विमाशिसंचे चंद्रपूर जिल्हा(ग्रामिण) चे अध्यक्ष सुनील शेरकी, कार्यवाह. दीपक धोपटे , महानगराचे कार्यवाह सुरेंद्र अडबाले, प्राचार्य साईनाथ मेश्राम, जिल्हा समितीचे सल्लागार . नामदेव ठेंगणे , जिल्हा सहकार्यवाह हरिहर खरवडे व साधुजी बावणे उपस्थित होते. यात तालुका अध्यक्षपदी गणेश गोडे, कार्यवाहपदी प्रशांत धाबेकर, कोषाध्यक्षपदी वामन टेकाम, गडचांदूर शहर अध्यक्षपदी गजानन बोबडे , गडचांदूर शहर कार्यवाहपदी संतोष मुंगूले उपाध्यक्ष रत्नाकर लांडे, शंकर वाघाडे, रुपेश विरूटकर,स्वेतलाना टिपले , सहकार्यवाह गजानन वासेकर, गणेश लांडे, रमेश आडे, संघटक म्हणुन रामकृष्ण रोगे, ए.डी.सातपुते, प्रसिद्धी प्रमुख म्हणून मंगेश माडूरवार, अरून मेश्राम, तर सल्लागार म्हणून एच.बी.मस्की, एस व्ही बावणे, संजय ठावरी,विणा देशमूख यांची निवड करण्यात आली. सदर सभेचे संचालन संतोष मुंगूले, प्रास्ताविक एच.बी.मस्की तर आभार प्रदर्शन साधुजी बावणे यांनी केले.