लोकदर्शन👉मोहन भारती
गडचांदूर :शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशान्वये शैक्षणिक सत्र २०२३-२४ करिता शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बल्लारपूर तालुक्यातील सन्मित्र सैनिक विद्यालयातील शिक्षक गुरुदास कामडी यांनी तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे.
६ मे २०२५ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हा व तालुकास्तरीय बक्षिस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत , कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर चे कार्यकारी प्राचार्य राजकुमार हिवारे, अश्विनी सोनवणे जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक,राजेश पाताळे जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक ,निकिता ठाकरे उप शिक्षणाधिकारी माध्यमिक, निवास कांबळे, उप शिक्षणाधिकारी प्राथमिक ,मनोज गौरकर गट शिक्षणाधिकारी , यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा व तालुकास्तरीय बक्षिस वपारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
शासनात शासनाच्या निर्देशान्वये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर तर्फे शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा एकूण सहा गटात आयोजित करण्यात आले होती.त्यामध्ये उच्च प्राथमिक गट वर्ग ६ ते ८ या गटातून गुरुदास कामडी यांनी नैसर्गिक साधनसंपत्ती या घटकांवर शैक्षणिक व्हिडीओ तयार करून पारितोषिक प्राप्त केले आहे. प्राचार्य राजकुमार हिवारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
शैक्षणिक साधन निर्मिती या यु-टयुब चाँनलची निर्मिती करून कोव्हिड काळामध्ये इयत्ता ६वी ते १०वी करिता भूगोल विषयावर विविध घटकांर शैक्षणिक व्हिडीओ तयार करून विद्यार्थ्यांना आँन-लाईन शिक्षणाच्या माध्यमातून गुरुदास कामडी यांनी मार्गदर्शन केले आहे.
गुरुदास कामडी यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य अरुंधतीताई कावडकर विषय तज्ञ संगीता कामडी यांना दिलेले आहे .
या यशाबद्दल प्राचार्य कु.अरुंधतीताई कावडकर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मित्र परिवारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.