By : लोकदर्शन प्रतिनिधी
मुंबई : वस्तू व सेवाकर भवन, माझगाव, मुंबई या शासनाच्या ईमारतीत कार्यरत असलेल्या अनेक खासगी संस्थांनी शासनाच्या वापर करत असलेल्या जागेचे भाडे महाराष्ट्र शासन निर्णय दि. १६ आॅक्टोंबर २००३, व दि. ०८ सप्टेंबर २००४ च्या नियमानुसार भरणे बंधनकारक असतानाही, सन २००३ पासून ते जानेवारी २०२५ पर्यंनतचे या कालावधीतील गेल्या २३ वर्षांचे एकूण रुपये*
*५, ८१,३७,१९९ रुपये थकबाकी थकविले आहेत. ही बाब माहिती अधिकारात वसंत उटीकर यांनी उघडकीस आणली आहे.
सेवानिवृत्त अधिकारी वसंत उटीकर यांनी दिनांक ०३.०२.२०२५ रोजीच्या माहितीच्या अधिकारात अर्ज केलेला होता. संबंधित माहिती अधिका-याने दिनांक २८.०२.२०२५ रोजी उटीकर यांना माहिती पुरविली.*
*परंतु पुरविलेल्या संबंधित माहिती मध्ये सदर संस्थाच्या थकबाकी मध्ये रुपये* *२३,४२,०७३/- ईतकी कमी रक्कम दाखविण्यात आलेली होती, ही चुक उटीकर यांच्या निदर्शनास आली व उटीकर यांना चुकीची व दिशाभूल करणारी माहिती त्यांनी पुरविण्यात आलेली होती.*
*त्यामुळे उटीकर यांनी दिनांक ०५.०३.२०२५ रोजी राज्यकर आयुक्त कार्यालयात प्रथम अपिल दाखल केले. सदर प्रकरणात दिनांक १८.०३.२०२५ रोजी पार पडलेल्या सुनावणीत सदर चुक ही परिगणना करतांना EXCEL SHEET मध्ये फाॅरमुले चुकीचे लागल्याने रुपये २३,४२,०७२/- कमी लागल्याचे मान्य केले. तसेच अद्याप एकही वसुली झालेली नाही हे संबंधित अधिका-याने मान्य केले व तशी नोंद संबंधित धारिणीतील कार्यवाही पत्रकात श्री. शरद पाटील, प्रथम अपिलीय अधिका-याने घेतली व*
*सुनावणीत उपस्थित असलेल्या सर्व अधिका-यांची उटीकर यांच्या समक्ष स्वाक्षरी घेवून सुनावणी संपलेली होती.*
*दिनांक ०२.०४.२०२५ रोजीच्या प्रथम अपिल आदेशानुसार संबंधित माहिती अधिकारी यांनी दिनांक २२.०४.२०२५ रोजीच्या पत्राद्वारे उटीकर यांना माहिती पुरविण्यात आली.*
*वस्तू व सेवाकर विभागाने माहितीच्या अधिकारात दिनांक २२.०४.२०२५ च्या पत्रासोबत उटीकर यांना कोट्यावधी रुपये थकबाकी थकविल्या बाबतची माहिती मिळाली आहे.*
*सन २००३ ते जानेवारी २०२५ पर्यंतची तब्बल २३ वर्षाची संस्थानी थकविलेल्या थकबाकीची यादी खालील प्रमाणे*
*१) विक्रीकर न्यायाधिकरण*
*बार असोसिएशन*
*रुपये ७५,५८,५११/-*
*२) विक्रीकर सल्लागार*
*संघटना*
*रुपये २,३५,३५,०२८/-*
*३) वस्तू व सेवाकर*
*कर्मचारी सहकारी*
*पतपेढी*
*रुपये ७८,४८,९७०/-*
*४) शिवजयंती उत्सव*
*समिती*
*रुपये ३७,६१,८१३/-*
*५) डॉ बाबासाहेब*
*आंबेडकर वाचनालय*
*रुपये १,२४,२९,७३०/-*
*६) विक्रीकर जिमखाना*
*(दि. ३१.०१.२०१९*
*पर्यंत)*
*रुपये ३०,०३,१४७/-*
——————————–
*एकुण थकबाकी*
*रुपये ५,८१,३७,१९९/-*
——————————–
*याबाबत श्री वसंत शामराव उटीकर, सेवानिवृत्त राज्यकर निरीक्षक, भायखळा, मुंबई यांनी सर्व प्रथम हे प्रकरण सन-२०१३ साली उघडकीस आणले होते. उटीकर हे गेल्या १२ वर्षांपासून सदर प्रकरणात राज्यकर आयुक्त व महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. तसेच विधानसभा, विधान परिषद आणि लोकायुक्त कार्यालयात ही सदर बाब निदर्शनास आणून दिलेली होती. परंतु याबबातची कोणीही गंभीर दखल अद्यापही घेतली नघेतली अथवा याबाबत कोणताही ठोस निर्णय हा झालेला नाही.!!!*
*वस्तू व सेवाकर विभागाने संबंधित संस्थाना सदर थकबाकीची रक्कम भरण्या बाबतच्या कायदेशीर नोटीसाही अनेक वेळा पाठविलेल्या आहेत. परंतु सदर नोटीसांना कोणीही संस्था अजिबातच दाद देत नाही. त्यामुळे सदर कोट्यावधी रुपये रक्कम वसूल करण्यासाठी वस्तू व सेवाकर विभागातील सर्व अधिकारी हे पुर्णत: असमर्थ ठरलेले असून एकही सक्षम अधिकारी हा वस्तू व सेवाकर विभागात नाही, हे माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहिती वरुन स्पष्टपणे दिसून होते.*
*त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असल्याने, याबाबत उटीकर यांनी अतिशय तीव्र खेद व्यक्त केला आहे.*
*वस्तू व सेवाकर भवनाच्या केवळ एका शासकीय इमारतीतील अशासकीय कार्यालयांना रुपये ५,८१,३७,१९९/- भरायला येत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या मंत्रालयासहीत अनेक कार्यालये आहेत आणि अशा कार्यालयांमध्ये अनेक खाजगी संस्था कार्यरत असु शकतात, याची शासन स्तरावर उच्च चोकशी केल्यास महाराष्ट्र शासनास रुपये महाराष्ट १०० ते २०० कोटी महसूल निश्चितच मिळू शकेल, असा दावाही उटीकर यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे.