कोरपना येथे भव्य महाआरोग्य शिबीर संपन्न. ११९९ रुग्णांनी केली विविध आजारांची निःशुल्क तपासणी, तर ४१२ रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया

कोरपना येथे भव्य महाआरोग्य शिबीर संपन्न.

११९९ रुग्णांनी केली विविध आजारांची निःशुल्क तपासणी, तर ४१२ रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया.

लोकदर्शन -: शिवाजी सेलोकर

कोरपना,
शहरातील जिल्हा परिषद शाळेत आज भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला.
मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय कोरपना तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचे उद्घाटन आमदार श्री. देवराव भोंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दिवसभर चाललेल्या या शिबीराचा कोरपना शहर व परिसरातील ११९९ नागरीकांनी लाभ घेतला.
सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या शिबीरात मेडिसीन, नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रिरोग, कान-नाक-घसा, अस्तिरोग, त्वचारोग आणि कॅन्सर यांसारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. यामध्ये तपासणी झालेल्या ११९९ रुग्णांपैकी ४१२ रूग्ण हे शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरले. त्यांचेवर आजपासूनच टप्प्या-टप्प्याने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे शस्त्रक्रिया पार पडणार आहेत.
यासोबतच, उपस्थित डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले आणि निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या सूचना ही दिल्या.
याप्रसंगी बोलताना आमदार देवराव भोंगळे यांनी नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आम्हाला सेवेचा मंत्र दिला आहे आणि त्यांच्या प्रेरणेतूनच गोरगरीबांच्या सेवेचा हा वसा पुढे नेत आम्ही दरवर्षी अशा सेवाभावी शिबीरांचे आयोजन करत असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात ग्रामीण भागातील गोरगरिब बांधव आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात; अनेकदा पैशाअभावी गंभीर स्वरूपाचे आजार अंगावर काढतात त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. अशावेळी कोरपना शहर व परिसरात राहणाऱ्या गोरगरिब बांधवांना एकाच छताखाली आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आजचे हे शिबीर आयोजित करण्यात आले. असे प्रतिपादन करीत शिबीराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार ही मानले.
या महाआरोग्य शिबीराला भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, शहर अध्यक्ष अमोल आसेकर, अरुण मडावी, विशाल गज्जलवार, पुरुषोत्तम भोंगळे, प्रमोद कोडापे, अरुण डोहे, विजय पानघाटे, आशिष ताजणे, अल्काताई रणदिवे, ज्योत्सना वैरागडे, किशोर बावणे, संजय पिंपळशेंडे, अबरार अली, डॉ. गायकवाड, डॉ. वाघ, मनोज तुमराम, रवी बंडीवार, भाऊराव कारेकर, दिनेश सुर, अरविंद तिरणकार, उमेश पालीवाल, दिनेश खडसे, पवन बुरेवार, तिरुपती किन्नाके, अविनाश वाबिटकर, नागोराम आत्राम, अशोक झाडे, लोडबा पा. इंगळे, शैलेश परसुटकर, वर्षा लांडगे, संगीता चिंतलवार, सविता तूमराम, शोभा बहरे, पिंकी उरकुडे, गीताताई डोहे, अनिल देरकर, सुभाष हरबळे, गणेश गोडे, शंकर आपूरकर, दिनेश ढेंगळे, प्रमोद शेंडे, सागर धुर्वे, हर्षल चामाटे, सत्यवान चामाटे, आशिष ढुमणे, अंकित ठाकरे, भिकाजी गोगुल, वैभव गाढवे, अनिल शेंडे, बाळा पावडे, सचिन उरकुडे, विनोद कुचनकर, निखिल काथवटे, विठ्ठल निमकर, हरिओम लेनगुरे, सुरेश मुद्दलवार, संजय मुद्दलवार, शिवम डवरे, राजू तिखट, सूर्यभान सोनपितरे, रवींद्र आगलावे, कुणाल मोहितकर, रमेश पावडे, प्रवीण हेपट यांचेसह आदिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here