काँग्रेसचा गड पून्हा काबीज करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – आमदार अँड. अभिजित वंजारी. ♦️राजुरा येथे राजुरा, गोंडपिपरी काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक.

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार राजुरा व गोंडपिपरी तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने गांधी भवन, गांधी चौक राजुरा येथे जिल्याचे पक्ष निरीक्षक आमदार अँड. अभिजित वंजारी, खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा प्रभारी मुजीब पठाण, कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थित आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. अँड. अभिजित वंजारी यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून येथे जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचेच उमेदवार विजयी होत आलेले आहेत. यावेळी सर्व काही व्यवस्थित असताना आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याचे चिंतन करून आपण कुठे कमी पडलो ते लक्षात घेऊन आपला बालेकिल्ला, आपला गड पून्हा काबीज करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात पक्षासाठी पुरेशी वेळ देऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कष्टाळू कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत काम करण्यासाठी पुढे यावे तसेच ज्यांची ही तयारी नाही त्यांना नारळ दिलाच जाणार आहे किंवा त्यांनी स्वतःहून परिश्रमी व्यक्तींना संधी द्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते विनोद दतात्रय, महिला जिल्हाध्यक्षा सुनंदाताई धोबे, माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, तालुकाध्यक्ष देविदास सातपुते, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवार, अँड. सदानंद लांडे, अँड. अरूण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती विकास देवाळकर, उमाकांत धांडे, संभूजी येलेकर, साईनाथ बतकमवार, नंदकिशोर वाढई, संतोष गटलेवार, एजाज अहमद, अब्दुल जमीर, कोमल फुसाटे, दिपक भलके, तुकाराम झाडे, राजु झाडे, अशोक रेचनकर, गौतम झाडे, फिरोज पठाण, बाबुराव बोंडे, नामदेव धोटे, महिला तालुकाध्यक्षा निर्मला कुडमेथे, सोनू दिवसे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, माजी सभापती कुंदाताई जेनेकर, कविता उपरे, पुणम गिरसावळे, ज्योतीताई शेंडे, इंदूबाई निकोडे, अर्चना चल्लावार, सुमित्राबाई कुचनकर, यासह राजुरा व गोंडपिपरी तालुक्यातील तालुका कांग्रेस, महिला कांग्रेस, युवक काँग्रेस चे पदाधिकारी, कांग्रेस प्रणित नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बाजार समिती पदाधिकारी, संचालक, सोसायटीचे संचालक तथा काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here