By : Shankar Tadas
गडचांदूर : राजुरा महामार्गावरील होली फॅमिली पब्लिक स्कूल जवळ नवनिर्मित राज्यमार्गाच्या रस्ते दुभाजकावर आदळून दोन युवक युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली.
गडचांदूर मार्गे काही कामानिमित्त एका मोटर सायकल वर अनुज भोयर वय 26 वर्ष व सीता फुसाम वय 22 वर्ष दोघेही जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावर असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळले. त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रक खाली दोघेही आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भयावह होता की दोघांनाही जागीच आपला जीव गमवावा लागला. अपघाताची माहिती गडचांदूर पोलिसांना होताच घटनास्थळ गाठून पंचनामा करत दोन्ही प्रेत उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे पाठविण्यात आले. माहितीनुसार, दोघेही मृतक बेला पाटण येथील असून एकमेकांच्या शेजारी राहत होते. घटना कळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली असून पुढील तपास गडचांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम हे करीत आहेत.