लोकदर्शन जिवती👉गजानन राऊत
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मंत्रालय मुंबई व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत युवा संसद 2025 चे आयोजन करण्यात आले होते.
*”विकसित भारत युवा संसद 2025″* हा कार्यक्रम, जो 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आणि इतरांसाठी 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या ध्येयावर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ आहे, या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे युवा पिढीला सक्षम करणे आणि त्यांना राष्ट्रीय आणि जागतिक समस्यांवर चर्चा व वादविवाद करण्यासाठी प्रोत्साहन देणे, तसेच राष्ट्र उभारणीत त्यांची भूमिका वाढवणे आहे. या स्पर्धेचा विषय होता. *”एक देश एक निवडणूक”* यात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात *विदर्भ महाविद्यालय जिवती* येथील ग्रामीण व दुर्गम भागात वास्तव्यास असणाऱ्या *कुमारी समीक्षा लक्ष्मण जाधव* बी. एससी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीने *”एक देश एक निवडणूक”* ही संकल्पना व्यवहारात आणल्याने राजकीय स्थिरता वाढेल तसेच वेळेचे नियोजन करुन , सरकारी योजना निरंतर देशाच्या विकासाकरिता गतिमान होईल. असे प्रखर मत मांडले. तिच्या स्पष्ट विचारशक्ती व प्रखर वानीने तिला दिनांक २६ मार्च रोजी विधानभवन मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली. तिला मिळालेल्या यशामुळे परीसरात व महाविद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या यशा करिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शाक्य मॅडम यांचे मार्गदर्शन व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. सचिन यनगंदलवार तसेच माहविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तिच्या परिवार यांनी परिश्रम घेतले.