By : Shankar Tadas
कोरपना : तालुक्यातील कढोली खुर्द येथे २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती कोरपना कार्यालय मार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सोनूर्ली शाळेच्या विद्यार्थ्यांनी सरावाच्या बळावर विविध मैदानी स्पर्धा प्रकारात बाजी मारली.
प्राथमिक गटात १०० मीटर मुली धावणे
या स्पर्धेत प्रथम क्रमांक, २०० मीटर मुली धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक ,१०० मीटर मुले धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक, २०० मीटर मुले धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक, रिले रेस मुली या प्रकारात द्वितीय क्रमांक , रिले रेस मुले या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.
माध्यमिक गट मुली खो-खो या खेळात द्वितीय क्रमांक , २०० मीटर मुली धावणेया प्रकारात द्वितीय क्रमांक , ४०० मीटर मुली धावणेया प्रकारात द्वितीय क्रमांक व रिले रेस मुली या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.
तसेच या वेळी तालुका स्तरीय नवरत्न स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यात प्राथमिक गटात आकांक्षा छगन देरकरने स्वयंस्फुर्त लेखन या प्रकारात द्वितीय क्रमांक, आरोही संदीप नगराळेने बुद्धिमापन या प्रकारात द्वितीय क्रमांक व माध्यमिक गटात आराध्या चंद्रप्रकाश दुर्गेनेसुंदर हस्ताक्षरया स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या तालुका स्तरीय बालक्रीडा स्पर्धेत शाळेने तब्बल १८ पदक व ४ शिल्ड प्राप्त करून घवघवीत यश संपादित केले.
यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक बाळा बोढे यांनी सांगितले हे यश विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम पालकांचे सहकार्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश मोहितकर व इतर सदस्य , विस्तार अधिकारी कल्याण जोगदंड, केंद्रप्रमुख विलास देवाळकर यांचे मार्गदर्शन व शाळेतील शिक्षक विजय राऊत, विनायक राठोड, प्रभावती हिरादेवे, मेनका मुंडे शिक्षणप्रेमी पल्लवी कांबळे व क्रीडाशिक्षक सुनील अलोने यांच्या परिश्रमाचे फलीत आहे.