लोकदर्शन मुंबई 👉-गुरुनाथ तिरपणकर
परिवर्तन वेलफेअर फाऊंडेशन अंतर्गत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.राजू वाघमारे(शिवसेना शिंदे गटाचे सहप्रवक्ते/उपनेते)यांचा वाढदिवस नुकताच सदाकांत ढवण उद्यान,नायगाव,दादर पुर्व येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी मोनार्च डायंमडचे संस्थापक महेश उकार्डे,भाजपा म्हाडा सेल शिवडी विधानसभा क्षेत्राचे महामंत्री मंगेश कडुलकर तसेच जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन अभिष्टचिंतन केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.सहप्रवक्ते-उपनेते डाॅ.राजू वाघमारे यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.उपस्थितांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.तसेच लकी ड्राॅच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पैठणी भेट देण्यात आली.याप्रसंगी डाॅ.राजू वाघमारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थितीती दर्शविली होती.