By : Shankar Tadas
भोयगाव : संभाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजुरा द्वारा संचालित राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. विद्यालयातून बॅड पथकासह गावात प्रभातफेरी काढण्यात आली. जी. प. उच्च प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत भोयगांव येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राजेंद्र विद्यालय भोयगांव च्या प्रांगणात सर्वांच्या उपस्थित राजेंद्र विद्यालय भोयगांव चे मुख्याध्यापक गुलाब मधुकर लांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण प्रसंगी गावातील प्रतिष्ठीत नागरिक, युवा वर्ग व महिला वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता. ग्रामपंचायत भोयगांव चे सर्व पदाधिकारी, राजेंद्र विद्यालय भोयगांव चे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच केंद्र भोयगांव चे केंद्रप्रमुख, जी. प. उच्च प्राथमिक शाळा भोयगांव चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
ध्वजारोहण कार्यक्रमा नंतर राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र विद्यालय भोयगांव चे मुख्याध्यापक जी. एम. लांडे, प्रमुख पाहुणे म्हणून भोयगांवच्या प्रथम नागरिक सौ. शालिनीताई बोंडे, राजेंद्र विद्यालय भोयगांव शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र वरारकर, भोयगांव चे पोलिस पाटील पुरूषोत्तम गावंडे, जी. प. शाळा भोयगांव चे केंद्रप्रमुख कोहपरे सर, मुख्याध्यापक सोनवणे सर, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अरविंद लांजेकर, ग्रामपंचायत भोयगांव चे सर्व पदाधिकारी, ग्रामसेवक ढेरे मॅडम, सी. एच. ओ. चंदनखेडे मॅडम, अंगणवाडी सेविका व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीतांनी व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. डी. ठाकरे यांनी केले. याप्रसंगी भोयगांव चे पोलीस पाटील पुरूषोत्तम गावंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जी. एम. लांडे यांनी प्रजासत्ताकाचे महत्त्व विषद करतांना प्रत्येकांनी सुधारण्याची सुरूवात स्वतःपासून करण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुनिता गाडगे मॅडम यांनी केले तर पाहुण्यांचे आभार डी. डी. ठाकरे यांनी मानले.