शंकरपटाचा थरार अन् नाटकांची मेजवानी !

By : Aashish Dhumne

कोरपना :

नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीपासून कोरपणा तालुक्यातील नारंडा येते खास मकर संक्रांति निमित्त लोकाग्रस्त दीडशे वर्षाची परंपरा असलेला विदर्भातील नावाजलेला मानाचा शंकरपट बैलजोडी शर्यतीच्या शंकरपटाला दिनांक १३-१४ व १५ जानेवारीला ला सुरुवात होते. तिन दिवस येथे शंकरपटाचा तरार बघायला मिळतो, तर रात्री १३ जानेवारी ला
नवयुवक एक नाट्य कला मंडळाच्या वतीने नाटकांच्ये आयोजन केले जाते त्यामुळे परिसरात सणासारखे वातावरण असते.

डिसेंबर महिन्यात शेतीची कामे संपतात. शेतकरी तसेच त्यांची बैलजोडी यांना उसंत यावेळीच असते. अशा वेळी करमणुकीकडे लक्ष वेधणे अगदी साहजिकच आहे. त्यामुळे बैलजोडीचा शंकरपट म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असते. शहरातील तसेच निरनिराळ्या खेड्यांत शंकरपटाला सुरुवात होते. कोरपणा तालुक्यातील नारंडा गावचा शंकरपट सर्वत्र विदर्भात प्रसिद्ध आहेत. शंकरपटाचे आयोजन देवस्थान कमिटी, करते.
सकाळी शंकरपट झाल्यानंतर रात्री नाटकाचे आयोजन केले असतात. शंकरपट व नाटक पाहण्यासाठी गावातील प्रत्येकांच्याच घरी मित्रमंडळी, पाहुणे येत असतात. त्यामुळे शंकरपटानिमित उत्साहाचे वातावरण असते. त्यामुळे शंकरपटाची हौस, रात्री नाटकाचा थरार पाहण्याची तसेच रात्री नाटक बधण्यासाठी प्रेक्षकांची तोबा गर्दी असते. आजूबाजूच्या गावातील नागरिकही नाटक तसेच शंकरप बघायला जात असतात .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here