व्हॉइस ऑफ मीडिया च्या तालुका अध्यक्षपदी प्रमोद वाघाडे अविरोध

By : Shankar Tadas
कोरपना :
व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने चंद्रपूर येथे बुधवारी पार पडली.
कोरपना तालुका अध्यक्षपदी प्रमोद वाघाडे सर यांची अविरोधी निवड करण्यात आली आहे.
राज्य, विभागीय तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हा अध्यक्षपदाकरिता वरोरा येथील अनिल पाटील सर आणि राजुराचे अनिल बाळसराफ सर यांची नावे देण्यात आली. त्यापैकी 81 मते प्राप्त करीत बाळसराफ सर विजयी झाले.
प्रतिस्पर्धी अनिल पाटील सर यांना ४८ मते मिळाली तर १ मत अवैध ठरले.
त्याच प्रमाणे प्रत्येक तालुक्याचे अध्यक्षही निवडण्यात आले.सर्व तालुक्यात अविरोध निवड झाली. इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हा अध्यक्षपदी आशिष रैच यांची अविरोध निवड झाली. कोरपना तालुका अध्यक्षपदी प्रमोद वाघाडे सर यांची निवड झाली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here