By : Shankar Tadas
कोरपना :
कोरपना शहर भाजपच्या वतीने शुक्रवारी आयोजित आभार रॅली व जाहीर सभेस उपस्थित राहून आमदार देवरावदादा भोंगळे यांनी जनता-जनार्दनाचे जाहीर आभार मानले. शहरातील कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
मागील दीड वर्षांपासून मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून या भागातील नागरिकांची प्रामाणिकपणे सेवा केली आहे. गत विधानसभा निवडणुकीस सामोरे जाताना माझे काम, माझे कर्तुत्व आणि माझा प्रामाणिकपणा मायबाप जनतेसमोर मांडला आणि ते जनतेला आवडले. भाजप व मित्रपक्ष महायुतीच्या ऊर्जावान कार्यकर्त्यांची साथ लाभली आणि मी विजयश्री खेचून आणली.
आपल्या प्रेमाची व आशीर्वादाची उतराई मी या जन्मात तरी करू शकेल असे वाटत नाही. परंतु, या विधानसभेतील जनतेच्या सेवेतून व राजुरा मतदारसंघाच्या विकासातून जनतेने दिलेल्या मतांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी कटिबद्ध राहून काम करेल, असा विश्वास जाहीर सभेत आमदार भोंगळे यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते आबिद अली, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, शहराध्यक्ष अमोल आसेकर, तालुका महामंत्री विजय रणदिवे, प्रमोद कोडापे, विशाल गज्जलवार, विजयालक्ष्मीताई डोहे, पुरुषोत्तम भोंगळे, शशिकांत आडकिणे, विनोद चौधरी, नारायण हिवरकर, किशोर बावणे, सुरेश रागीट, दत्ता राठोड, अरूण डोहे, दिनेश खडसे, ओम पवार, गिता डोहे, विना मुद्दमवार, वर्षा लांडगे, रेश्मा मडावी, जया धारणकर, जगदीश पिंपळकर, मनोज तुमराम, उमेश पालिवाल यांच्यासह सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.