जिवतीत शेतकरी संघटनेला खिंडार : शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

जिवती (ता.प्र) :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत जिवती तालुक्यातील मौजा येल्लापुर (कोलागुडा) आणि टेकामांडवा येथील शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. सर्वांना काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, मच्छिंद्र मानकर, डॉ. जांभूळकर, भाऊराव कारेकर, जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, प्रा. सुग्रीव गोतावळे यांनी काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन काँग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत विकासपुरुष आ. सुभाषभाऊ धोटे यांच्या विजयासाठी जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यात शेतकरी संघटनेचे येल्लापुर (कोलाम गुडा) येथील रामा सिडाम, भीमा सिडाम, आयु मळावी, देवराव सिडाम, राजू मडावी, मारू आत्राम, शांताबाई कोडापे, गिरजाबाई सिडाम, लेथुबाई सिडाम, रामबाई सिडाम, भिमाबाई कोडापे, चित्राबाई सिडाम, कर्णुबाई आत्राम, लक्ष्मीबाई आत्राम, मारूबाई कोडापे, सतीश सिडाम, लक्ष्मण मडावी तर टेकामांडवा येथील दारूल शेख, आयसीराम सोनकांबळे, विठ्ठल कंचकटले, आनंद कोमले, विठ्ठल बंडे, संतोष येकेवार, संतोष वाघमारे, शुद्धोधन वाघमारे मंगेश कोमले, अर्जुन बंडे, अरुण बंडे, गोंदनबाई वाघमारे, कमलबाई बंडे, रुक्मिणीबाई सोनकांबळे, फातिमा पठाण, सिद्धार्थ बंडे, समाधान बंडे, रावसाहेब गोटमवार, सुरेश घोबले, नूर मोहम्मद पठाण, बालाजी भोगणे, सुरज कंचकटले यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here