प्रा.शरदचंद्र काकडे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

लोकदर्शन 👉 रंगनाथ ढोक

*पांगारे*…पुरंदर तालुक्यातील पांगारे या गावी भाऊवाडा या ठिकाणी प्रा.शरदचंद्र काकडे यांच्या मळ्याच्या वाटेवरी आणि पालवी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन हास्यसम्राट, मा.बंडा जोशी,माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ , प्रिया दामले ,मा.योगेश शेलार,अखंडित कल्याणकारी समुहाचे अध्यक्ष, मा.प्रा.कल्याण राऊत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले ,या प्रसंगी अँड. शैलजा पिसाळ ,चंदुकाका देशमुख , मा.विजय सातपुते धनःशाम घोरपडे ,महात्मा फुले चरित्र साधने साहित्य प्रकाशन समिती,महाराष्ट्र शासनाचे नि.सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक उपस्थित होते
या निमित्ताने कविसंमेलन घेण्यात आले महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या 52 कविंनी आपल्या बहारदार रचना सादर करुन उपस्थितांचे मन जिंकून घेतले..कवी, संदीप पाचारणे भाग्यश्री दायमा संतोष काकडे .योगिता कोठेकर यांच्या काव्यरचनांना प्रचंड दाद मिळाली
या कार्यक्रमाचे आयोजन राजयुवा प्रकाशन यांनी केले सूत्र संचालन श्री शैल सुतार , सौ.वैशाली पाखले यांनी केले . श्रीराम घडे यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here