सामाजिक संदेश देत धोपटाळा ते रायगड धावणार आयुष टेकाम : आमदार सुभाष धोटेंनी हिरवी झंडी दाखवून दिल्या शुभेच्छा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा — देशात आणि महाराष्ट्रातील स्त्रियांवरील वाढते अत्याचार दूर व्हावेत, सर्व धर्म समभाव वृद्धिंगत, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, शेतकर्‍यांना सुख समृद्धी लाभावी इत्यादी सामाजिक संदेश घेऊन धोपटाळ्याचा आयुष टेकाम गुरूदेव चौक, गुरुदेव नगर, धोपटाळा ते रायगड अशी दौड पुर्ण करून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर जावून नतमस्तक होणार आहे. तो दररोज ४० किलोमीटरवर धावणार असून त्याच्या सोबत बाईकवर नकुल सुक्रू धुर्वे हा युवक असणार आहे. आज २ आक्टोंबर गांधी जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाला सुरवात झाली. लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी हिरवा झेंडा दाखवून त्याच्या या उपक्रमाला यश मिळावे अशा शुभेच्छा देऊन त्याला शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत रवाना केले.
यावेळी राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूर च्या नगराध्यक्षा सविताताई टेकाम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी जि. प. सदस्य संतोष चन्ने, महिपाल मडावी, कृ. उ. बा. स. संचालक जगदीश बुटले, सरपंच मैनाबाई नन्नवरे, उपसरपंच राजकूमार पाटील, ग्रा. प. सदस्य छाया वैद्य, संगिता हिवराळे, दिपक झाडे, आकाश दासर, श्रीधर रावला, प्रणाली जुलमे, मधुकर झाडे, अनंता एकडे, रमेश रणदिवे, रमु कमटम, भाऊराव इटणकर, संदीप नन्नवरे, हारून शेख यासह धोपटाळा येथील स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here