दिवंगत कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या जीवन चरित्रावर आधारित लेख कविता साहित्य पाठविण्याचे आवाहन.

लोकदर्शन उरण.👉विठ्ठल ममताबादे

उरण दि १ऑक्टोंबर प्रसिद्ध कामगार नेते, काँग्रेसचे कट्टर प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ते दिवंगत शाम म्हात्रे यांची ७ ऑक्टोबर २०२४ रोजी ६९ वी जयंती आहे. ही जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. दिवंगत कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेत. शाम म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त कविता, काव्य लेखन साहित्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धे अंतर्गत कवी लेखक यांनी शाम म्हात्रे यांच्या जीवन चरित्राशी संबंधित घटना, आठवणी, त्यांचे कार्य,संप आंदोलने,गाठीभेटी इत्यादी विषयासंदर्भात कविता, लेख साहित्य दिनांक ५/१०/२०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत स्पर्धेचे आयोजक श्वेता शिंदे व्हाट्सअप नंबर – 8793831051,एकनाथ ठोंबरे व्हाट्सअप नंबर – 9323775115 ,मंदार काने व्हाट्सअप नंबर – 9769515659, तरंग माने व्हाट्सअप नंबर – 7400472008 यांच्या व्हाट्सअप नंबर वर पाठवावे.स्पर्धेत कोणतेही व्यक्ती भाग घेऊ शकते. स्पर्धकांना कोणतेही वयोमर्यादा नाही.ज्या स्पर्धकांना पोस्टाने किंवा कुरिअर ने लेख कविता पाठवायचे असल्यास त्यांनी आगरी शिक्षण संस्था, प्लॉट नंबर ७२, ए/बी, सेक्टर ६ खांदा कॉलनी नवीन पनवेल पश्चिम,पिन कोड – ४१०२०६ या पत्त्यावर पाठवावे.दिवंगत कामगार नेते शाम म्हात्रे साहेबांच्या कार्याला, विचारांना, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन कामगार नेत्या श्रुती शाम म्हात्रे यांनी केले आहे.सदर विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह पनवेल येथे करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here