,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
देऊळगाव राजा शहरात दि. १९ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजता शहरातील कोंडवाडा परिसरातील गणेश मंडळाच्या टीन शेडचे पत्रे काढत असताना सामाजिक,धार्मिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या पप्पू उर्फ मोतीलाल लाड या युवकाचे विद्युत प्रवाह असलेल्या विद्युत तारेला धक्का लागून जागेवरच आकस्मिक निधन झाले. सदर घटनेमुळे देऊळगांव राजा शहर व परिसरात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांनी मोतीलाल ऊर्फ पप्पू लाड यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले तसेच या दु:खामध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत हा आधार दिला तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत जी काही मदत होईल ती मदत तातडीने पाठपुरावा करून करणार व स्वतः वैयक्तिक रोख रकमेची मुलीचे किंवा पत्नीच्या नावाने FD करणार असे सांगितले तसेच डॉ.रामप्रसादजी शेळके यांनी सुद्धा 51000/- रुपये मुलीच्या किंवा पत्नीच्या नावे देण्याचे सांगितले.
यावेळी डॉ.रामप्रसाद शेळके, संतोष खांडेभराड,मुन्ना ठाकूर, गणेश सवडे,विष्णू रामाने,राजू शिरसाट,विशाल पवार,संकेत पिंपळे आदींची उपस्थिती होती.
Home Breaking News आकस्मिक मृत्यू झालेल्या त्या गणेशभक्त युवकाच्या कुटुंबियांची आ.डॉ.राजेन्द्र शिंगणे यांची सांत्वनपर भेट*...