आ. सुभाष धोटेंच्या हस्ते संत सेवालाल महाराज मंदिर जवळ सामाजिक सभागृहाचे भुमिपुजन.

 

लोकदर्शन जिवती 👉मोहन भारती

जिवती :– जिवती येथे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते संत सेवालाल महाराज मंदिर जवळ सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल जिवती शहर सकल बंजारा समाजाच्या तर्फे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानण्यात आले. यावेळी आ. सुभाष धोटे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी जिवती तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गगपत आडे, काँग्रेसचे जेष्ठ नेते सुग्रीव गोतावळे, साहेबराव नाईक, नगरसेवक ममता जाधव, अमर राठोड, आशिष डसाने, लक्ष्मी जाधव, रोहिदास आडे, विजय राठोड, राहुल राठोड, रामराव जाधव, दत्ता राठोड, उत्तम आडे, सुभाष राठोड, लालसेन जाधव, प्रवीण राठोड, विष्णू राठोड, वजीर शेख यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here