कृषी उत्पन्न बाजार समिती मौदाची वार्षिक सर्वसाधारण सभा व धर्मकटा उद्घाटन व कृषि मेळावा सप्नन.

 

लोकदर्शन 👉प्रतिनिधी

स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समिती मौदा येथे रविवार दिनांक 22/09/2024रोजी मजी मंत्री सूनीलजी केदार साहेब व खासदार श्यामकुमारजी बर्व यांच्या हस्ते धर्मकाटा उद्घाटन समारंभ संपन्न होऊन त्यानंतर समितीची आमसभा धनजोडे सभागृह मौदा येथे समितीचे सेवा सह. संस्था., ग्रामपंचायत, अडते व्यापारी,हमाल मापडी,सदस्य, अध्यक्ष, सरपंच व शेतकरी वर्गाचे उपस्थितीत पार पाडण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील बाबू केदार कार्यक्रमाचे उद्घाटक व सत्कार मूर्ती श्यामकुमार बर्वे  खासदार रामटेक लोकसभा आणि प्रमुख अतिथीचे स्वागत करण्यात आले.
सर्वसाधारण सभा कार्यक्रमाची प्रस्ताविक समिनीचे संचालक राजेंद्र लांडे यांनी केली.अहवालाचे वाचन समितीचे सभापती राजेश ठवकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन समितीचे संचालक ज्ञानेश्र्वर वानखेडे यांनी केले. आभार उपसभापती रामनरेश सेनवर यांनी केले.
याप्रसंगी समितीचे प्रभारी सचिव प्रदीप पुरी यांनी कृषी मेळाव्याचे सूत्र संचालन केले समितीचे संचालक मंडळ ,सभासद,शेतकरी वर्ग व अधिकारी कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here