बाई कभी बाई शाळेचा फुटबॉल स्पर्धेत रोमांचक विजय..!

 

लोकदर्शन मुंबई, घाटकोपर👉 (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

डी.एस.ओ.आंतरशाळा अंतर्गत नुकतीच मुले-मुली वयोगट 17 फुटबॉल क्रीडा स्पर्धा मुंबई महारष्ट्र २०२४ – २५ आयोजीत करण्यात आली होती. हीं स्पर्धा घाटकोपर पोलीस स्टेडियम ग्राउंड येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांचा संघ ॲक्टिव्हिटी हायस्कूल विरुद्धच्या तीव्र सामन्यात बाई कभी बाई शाळा मधून शिवराज कांबळे यांनी उत्कृष्ट खेळ खेळून संघाला दुसऱ्या हाफ मध्ये 12 व्या मिनिटात एक गोल मारून विजय मिळवून दिला १-० च्या अंतिम स्कोअरसह विजयी झाला त्यात सर्व संघाने खूप मेहनत घेतली त्याचबरोबर शालेय प्रशिक्षक कुपीन तुस्कानो व मुख्य फुटबॉल प्रशिक्षक कोच तुषार चव्हाण यांनीसुद्धा संघासाठी खूप मेहनत घेऊन संघाला एक उच्च दर्जावर घेऊन जाण्यासाठी आम्ही अधिक प्रयत्नशील राहू आणि आणि जोमाने खेळू असे सांगितले आह़े.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here