अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे जीवती तालुक्यातील दुर्गम भागात पोषण सप्ताह साजरा . ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉प्रा
अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ ने आपल्या सामाजिक दायित्व द्वारे जीवती तालुक्यातील दुर्गम गावांच्या विकासा कडे लक्ष देत, राष्ट्रीय पोषण सप्ताह मोठ्या थाटात साजरा केलात.

जीवती तालुक्यातील आसापूर ग्रामपंचायत मधील लिंगनडोह, पेदासापूर, आसापूर व गढपांढरवणी अशा एकूण चार गांवतील जवळपास 100 महिलांसोबत पोषण आहार सप्ताह साजरा केलात.

या कार्यक्रमादरम्यान गांवतील महिलांना पोषण आहार व त्यांचे फायदे यांवर मार्गदर्शन करण्यात आलेत तर पौष्टिक आहार थाली स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विजेत्या महिलांना आसापूर ग्रामपंचायत चे सरपंच मंगेश सोयाम व उपसरपंच लच्चू सोयाम यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आलेत.

या पोषण सप्ताहला यशस्वी करण्यास चारही गांवातील अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस व आशा वर्कर यांचा सहयोग लाभला तर गांवतील नागरिकांनी व सरपंच यांनी माणिकगढचे मनापासून आभार व्यक्त केलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here