विदर्भ महाविद्यालय जिवती येथे कौशल्य मार्गदर्शन व समुपदेशन शिबिराचे आयोजन*

 

लोकदर्शन.👉 प्रा.गजानन राऊत

अंबुजा फाउंडेशन उपरवाही (शेडी) कौशल्य रोजगार उद्योजकता विकास संस्था व विदर्भ महाविद्यालय जिवती यांच्या संयुक्त विद्यमानाने, जिवती परिसरातील इयत्ता बारावी तथा पदवीधर उत्तीर्ण बेरोजगार विद्यार्थ्यांकरिता कौशल्य रोजगार मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमान्वये *दिनांक 24/08/2024 रोज शनिवार ला ठिक 11.00 वाजता* विद्यार्थ्यांना अनुभवी मार्गदर्शका द्वारे समुपदेशन व मनोमीतिय सल्ला देण्यात येईल. तरी या परिसरातील युवक युवतींना महाविद्यालयातर्फे आव्हान करण्यात येते की, मिळालेल्या या संधीचा लाभ घ्यावा. जे युवक व युवती कार्यक्रमात सहभागी होतील. अशा सर्व बेरोजगार युवक युतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. जिवती परिसरातील इच्छुकांनी विदर्भ महाविद्यालय जिवती येथे उपस्थित राहून, संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस.एच.शाक्य मॅडम यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी यांच्याशी संपर्क साधावा.
*डॉ. परवेज अली (रोजगार अधिकारी)*
*9561231171*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here