वर्ग २ जमिनी वर्ग १ करण्यासंदर्भात उपविभागीय कार्यालयात जनसुनावणी

By : Shankar Tadas

राजुरा : 

राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपणा, जिवती तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वर्ग-२ जमिनी वर्ग-१ करणे संदर्भात उपविभागीय कार्यालय राजुरा येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली.  सदर प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी केंद्रिय ओबिसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराजजी अहिर यांनी अधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी घेतली. यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख नेते माजी आमदार अँड संजयजी धोटे, माजी आमदार सुदर्शनजी निमकर, खुशालजी बोन्डे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी रविन्द्रकुमार माने, राजुरा कोरपणा जिवती येथील तहसीलदार यांच्या समेत मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

#DevendraFadanvis #HansrajAhir
#advsanjaydhote
#rajura
#rajuravidhansabha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here