नगर परिषद व पंचायत समिती देउळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत बाइक रॕली काढून जनजागृती

By : प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगांव राजा :

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत ११ऑगस्ट ला सकाळी ९.३० वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूल देऊळगाव राजा येथून बाईक रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री अरुण मोकळ व गटविकास अधिकारी श्री मुकेश मोहर,.शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात व शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी मार्गदर्शन केले.

पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री दादाराव मुसदवाले यांनी बाईक रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. सदर रॅली शहरातील मुख्य मार्गावरून निघाली व छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कूल येथे बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला.

गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले , प्राचार्य संजय देशमुख,पर्यवेक्षक राजेश सपाटे , विजय आव्हाने , युनूस खान,अभय जाधव , सुधाकर जायभाये तसेच नगर परिषद व पंचायत समितीचे शिक्षक व इतर कर्मचारी बाईक रॅलीत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here