स्वरांश तबला हार्मोनियम क्लास मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉प्रा अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
स्वरांश तबला आणि हार्मोनियम क्लास, गडचांदूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्ताने गुरुपूजन नुकतेच उत्साहाने संपन्न झाले. या गुरु पूजनाची सुरुवात सर्वप्रथम गुरुवर्य तसेच पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले, कार्यक्रमाला गुरुवर्य श्री .कार्तिक स्वामी कुचनकर श्रीमती .कोमल कुचनकर , तसेच श्री. फनीशंकर सर तसेच प्रमुख वक्ते श्री चंद्रकांत मोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर लगेच दिपप्रज्वलन कार्यक्रम, सरस्वती पूजन पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला लाभलेले गुरुवर्य तसेच पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात त्यानंतर लगेच गुरुपूजन केलेत त्याचबरोबर त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, तबलावादन, हार्मोनियम वादन तसेच प्रश्नमंजुषा ठेवण्यात आली होती.
या कार्यक्रमांमध्ये व्याख्यान ठेवण्यात आले होते हे गुरुपूजन तसेच संगीत याबद्दल होते त्या प्रमुख वक्त्यांनी kआपला बहुमोल वेळ देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले लगेचच चपला हार्मोनियम विद्यार्थ्यांना वि:शेष ,योग्यता प्रथम येणाऱ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here