देऊळगाव राजा तहसील कार्यालय येथे महसूल पंधरवाडा प्रारंभ ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा 👉प्रा.अशोक. डोईफोडे

शासन निर्णय दिनांक 30 जुलै 2024 नुसार दिनांक 01 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधी दरम्यान महसुल पंधरवाडा साजरा करण्याचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने प्रा.संजय खडसे, उपविभागीय अधिकारी,सिंदखेडराजा यांच्या अध्यक्षतेखाली व वैशाली डोंगरजाळ, तहसिलदार देउळगावराजा यांच्या उपस्थितीमध्ये तहसिल कार्यालय देउळगावराजा येथे दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी महसुल दिन साजरा करुन महसुल पंधरवाडयाचा 01 ऑगस्टपासुन शुभारंभ करण्यात आला.
प्रामुख्याने “माहिती कि-वास यंत्र” सुरु करुन त्यामध्ये “ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेकरीता आवश्यक असणारे विविध दाखल्याबाबतची माहिती व अर्ज भरण्याबाबतचे प्रात्याक्षीक लाभार्थी महिलांना दाखविण्यात आले. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता आवश्यक असणारे विविध दाखल्यांचे लाभार्थी महिलांना वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमा दरम्यान उपस्थित नागरीकांना महसुल पंधरवाडातील विविध योजनेबाबतची माहिती देवुन जास्तीत जास्त पात्र लाभार्थी यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा.संजय खडसे, मा.उपविभागीय अधिकारी,सिंदखेडराजा यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी बालाजी कौशल्ये, प्रभारी निवासी नायब तहसिलदार, प्रांजल पवार, नायब तहसीलदार सायली जाधव, परिविक्षाधिन नायब तहसिलदार व इतर तहसिल कार्यालय देउळगावराजा येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here