मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ‘बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या’ पोस्टरचे अनावरण* *🚩महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या संकल्पनेतील उपक्रम.*

 

लोकदर्शन मुंबई प्रतिनीधी👉: महेश कदम

पनवेल शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी *’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लघु चित्रपट महोत्सव २०२४* या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलचे पोस्टर अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी पार पडले. याद्वारे महाराष्ट्रातील विविध होतकरू कलाकारांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धे मध्ये सहभागी होणारे कलाकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या राजकीय जीवनावर किंवा त्यांनी जनसामान्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना कसा मिळाला यावर लघुपट म्हणजेच शॉर्ट फिल्म बनविणार आहेत. याचा दिमाखदार प्रीमियर पनवेल मध्ये सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येतील. असे ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here