सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षकरत्न पुरस्कार

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा : रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट फाऊंडेशन धुळे यांच्या कडून दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक व क्रीडा क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा जी.बी मुरारका कला व वाणिज्य महाविद्यालय शेगाव येथे दिनांक २८ जुलै २०२४ रोजी वितरित करण्यात येत आहे.
राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. मनोहर पाटील, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद पवार प्रशाकीय अधिकारी डॉ. प्रविण गिरसे ,डॉ. संभाजी पाटील, राष्ट्रीय सल्लागार डॉ. संजय गोरे यांनी या वर्षीचा भारत शिक्षक रत्न पुरस्कार गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद तथा अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांना जाहीर केला आहे. गुरुदास कामडी हे सन्मित्र सैनिकी विद्यालय चंद्रपूर येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वीही गुरुदास कामडी यांना उत्कृष्ट शिक्षक २००९,महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक , दैनिक लोकशाही आदर्श शिक्षक २०१२,बेस्ट टिचर अवार्ड २०१७ अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
गुरदास कामडी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळील सुरवात केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ,भारतीय जनता यवा मोर्चा, विदर्भ भटके-विमुक्त एकता संघटना च्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक प्रबोधन कार्यक्रमातून विविध कार्य केले आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व्यवस्थापन परिषद,अधिसभा सदस्य म्हणून विद्यापीठात महाविद्यालयीन शिक्षण व विद्यार्थ्यांचें प्रश्न मांडले आहेत. विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्र, पंडित दिनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासन,शारीरिक शिक्षण क्रीडा मंडळ सदस्य, संविधान सन्मान समरोह समिती सदस्य अशा विविध समितीवर कार्यरत आहेत.
गुरुदास कामडी उच्च शिक्षण व माध्यमिक शिक्षण यावर केलेले कार्य व भटके – विमुक्त समाज प्रबोधन व विद्यापीठा क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फांऊंडेशन धुळे यांच्या कडून भारत शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here