एक पेड मां के नाम”च्या अंतर्गत विदर्भ महाविद्यालयात वृक्षारोपण*

 

लोकदर्शन जिवती 👉 प्रा.गजानन राऊत

विदर्भ महाविद्यालय, जिवती येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने”एक पेड मा के नाम” च्या अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी महाविद्यायाच्या प्राचार्या डॉ. शारदा शाक्य, संस्थेचे सदस्य विठ्ठल पुरी, प्रा. गजानन राउत, प्रा. चतुरदास तेलंग, प्रा. लांडगे, प्रा. पानघाटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा शाक्य यांनी पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वृक्षाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. विठ्ठल पुरी यांनी वृक्ष लावण्यासोबतच त्याचे संरक्षण करणेही तेवढेच महत्वाचे आहे असे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रासेयो प्रमुख प्रा. सचिन यनगंदलवार, प्रा. संजयकुमार देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here