राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन*

 

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे

गडचांदूर – सरस्वती शिक्षण प्रसारक मंडल, गडचांदूर व्दारा संचालित सावित्रीबाई फुले विदयालय, क. महाविद्यालय गडचांदूर येथे लोकराजे, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 150 वी जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे, प्रा. प्रशांत खैरे, राजेश वासेकर उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मराज काळे यांनी शाहू महाराजांनी सामाजिक समता प्रस्थापित करून बहुजनांना शिक्षणाची दारे मोकळी केल्याचे सांगीतले याप्रसंगी प्रमुख अतिथिंनी सुध्दा शाहू महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती विशद केली.
सदर कार्यक्रमाचे संचालन तथा प्रास्ताविक ज्योती चटप यांनी तर आभार सुरेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळा, क.महाविदयालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here