,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सामाजिक जबाबदारी म्हणून महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा जुमडा तालुका देऊळगाव राजा या शाळेस पाच खोल्याला संपूर्ण रंगकाम करून दिले,तसेच शैक्षणिक बालचित्रकाम करून दिले झालेल्या लोकार्पण कार्यक्रमात महाफीडचे मराठवाडा विभागीय मॅनेजर श्री रामेश्वर शेजुळ व महाफीड कंपनीचे अधिकृत वितरक. श्री सोमनाथ सेठ कुमकर (समर्थ शेतीतंत्र अँड सेवा राजुर) यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमास महाफीडचे कर्मचारी तुळशीराम पवार. रामेश्वर पवार गावातील ग्रामपंचायत सदस्य विठोबा पवार उपसरपंच मनीषा अविनाश मुख्यदल व शालेय शिक्षण समिती सदस्य विकास शिंदे मुख्याध्यापक काकड सर गवळी सर जाधव सर पडघान सर मोरे मॅडम व गावातील पालकांची उपस्थिती होती या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रामेश्वर शेजुळ यांनी सामाजिक दायित्व म्हणून जिल्हा परिषद शाळेला मुलांच्या भौतिक व शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी महाफीड मदत करत राहील असे आश्वासित केले यावेळी महाफीड कंपनीचे संचालक श्री प्रवीण पाटील सर व उपस्थितांचे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक काकड यांनी आभार मानले
Home Breaking News महाफीड कंपनीकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस रंगरंगोटी व बालचित्रकाम ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,