म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनच्या उरण नगरपरीषद उरण युनिटची नवीन कार्यकारिणी जाहीर.

 

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे

उरण दि ३० जून.कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनच्या उरण नगरपरीषद उरण युनिटचे अध्यक्ष रमेश कांबळे हे तब्बल १५ वर्ष अध्यक्ष होते . ते ३१ में २०२४ रोजी निवृत्त झाले.या अनुषंगाने दि. २७ जून २०२४ रोजी संघटनेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पुढील कार्यकाळासाठी संघटनेच्या अध्यक्षपदी हरेश जाधव यांची निवड करून पुढील धुरा त्यांच्यावर सर्वानुमते सोपविण्यात आली. उरण नगरपरीषदेच्या युनिटची नवीन कार्यकारिणी संघटनेचे सरचिटणीस अनिल जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली.
अध्यक्ष हरेश जाधव, कार्याध्यक्ष मधूकर भोईर, सचिव नरेंद्र उभारे, खजिनदार माधव सिद्धेश्वरे,उपाध्यक्ष राजेश सोलंकी, उपाध्यक्ष महेंद्र साळवी, उपाध्यक्ष धनेश कासारे यांची नेमणूक उरण नगरपरीषद कर्मचाऱ्यांनी सर्वानुमते केली.निवड झालेल्या नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here