Home
Home राजुरा “वैचारिक ऊर्जा, संघटनाची नवी दिशा” ♦️राजुरा येथे भाजपच्या जिल्हास्तरीय अभ्यास वर्गास...

“वैचारिक ऊर्जा, संघटनाची नवी दिशा” ♦️राजुरा येथे भाजपच्या जिल्हास्तरीय अभ्यास वर्गास उत्साहपूर्ण सुरुवात

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा : भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – २०२६ अंतर्गत राजुरा येथील स्व. ॲड. दादाजी देशकर सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्गाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. जिल्हाभरातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अभ्यास वर्ग अत्यंत ऊर्जा आणि वैचारिक वातावरणात पार पडत आहे.

२३ मे २०२६ रोजी प्रशिक्षण वर्गाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या उत्साही व कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या प्रशिक्षण वर्गात कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती तसेच राष्ट्रहिताच्या विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षण हा भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आत्मा मानला जातो. कार्यकर्त्यांना वैचारिकदृष्ट्या सक्षम बनविणे, पक्षाचा इतिहास, कार्यपद्धती आणि ‘एकात्म मानव दर्शन व सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या पंचनिष्ठांचा परिचय करून देणे हा या महाअभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन सत्रात राज्याचे माजी मंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच माजी राज्यसभा सदस्य व माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार चित्राताई वाघ, आमदार प्रतापदादा अडसड, श्री. संजय फांजे आणि श्री. सागर फुंडकर यांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक ऊर्जा निर्माण केली.

पहिल्या दिवशी झालेल्या विविध सत्रांमध्ये संघटनात्मक कार्यपद्धती, बूथ व्यवस्थापन, ‘मन की बात’ उपक्रम, आयटी व सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करणे यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

आज, २४ मे रोजीही प्रशिक्षण वर्गात केंद्र व राज्य सरकारच्या गरीब कल्याणकारी योजनांचा प्रचार-प्रसार, देशासमोरील राजकीय व सामाजिक आव्हाने आणि संघटन विस्ताराची दिशा यावर व्यापक मंथन सुरू आहे.

हा प्रशिक्षण वर्ग केवळ एक संघटनात्मक उपक्रम नसून, भविष्यात पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी आणि लोककल्याणकारी विचार तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना मिळालेली नवी दिशा असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here