Home
Home जिवती शेणगावात होणार १४९.९५ लक्ष रुपयांचे सुसज्ज वाचनालय

शेणगावात होणार १४९.९५ लक्ष रुपयांचे सुसज्ज वाचनालय

By : Shankar Tadas
जिवती :
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीअंर्गत चंद्रपूर जिल्ह्यात २० ठिकाणी सुसज्ज वाचनालयांच्या बांधकामांना २९८४.९३ लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून याअंतर्गत जिवती तालुक्यातील शेणगांव येथे १४९.९५ लक्ष रूपयांचे सुसज्ज वाचनालय निर्माण होणार आहे. शेणगांव व परीसरातील होतकरू विद्यार्थ्यांकरीता सुसज्ज अशा वाचनालयाच्या निर्माणासाठी आमदार देवराव भोंगळे हे प्रयत्नरीत होते; त्यामुळे त्यांच्याही प्रयत्नांना आता यश आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा विचार करता जिवती तालुका तसा दुर्गम आहे. त्यामुळे या भागातील विकासाला चालना मिळावी; विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्या सुखसोई उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार देवराव भोंगळे मागील दोन वर्षांपासून प्रयत्नरीत होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून शेणगांव व परीसरातील विद्यार्थ्यांना या सुसज्ज वाचनालयाचा फायदा होणार आहे.
या वाचनालयाच्या बांधकामाकरीता भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांचे शेणगांव वासीयांसह भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, राजेश राठोड, तुकाराम वारलवाड, गोविंद टोकरे, नामदेव सलगर, विठल केजगिर, रामेश्वर देवकते, अजय खंदारे, चंद्रकांत राठोड, चंद्रकांत जाधव, साहेबराव पवार, बालाजी बिराजदार, गोविंद केजगीर, संग्राम बजगिर, संबा शिंदे, राजू रावनकुळे, अंगद तबुळे, सुभाष सलगर, मारोती बाजगिर, संदीप कांबळे, शेषेराव पवार, दिगांबर चव्हाण, गुरू पवार, हरिभाऊ शिंदे, पुष्पा कवडे, मारोती भनगिर, केशव गवाले आदिंनी आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here