Home
Home गडचांदूर / कोरपणा नांदा येथे होणार सुसज्ज वाचनालय : आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांना यश.

नांदा येथे होणार सुसज्ज वाचनालय : आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांना यश.

By : Shankar Tadas
कोरपना
तालुक्यातील नांदा (फाटा) येथे सुसज्ज अशा वाचनालय इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीअंर्गत १४९.६२ लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आणि राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांनी नांद्यात सुसज्ज अशा वाचनालयाच्या निर्मीतीमुळे परीसरातील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या चांगला फायदा होणार आहे.
या वाचनालयाच्या बांधकामाकरीता भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांचे भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, उपसरपंच पुरूषोत्तम आस्वले, शहराध्यक्ष संजय नित, सतीश जमदाडे, कैलास डाखरे, सुनिता आत्राम, कैलास ताकसांडे, संगीता ढोणे, नम्रता डुकरे, रंजिता धाबेकर आदिंनी आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here