Home
Home गडचांदूर / कोरपणा कोरपना-नारंडा -भोयगाव-चंद्रपूर बस सेवा सुरू करा : भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने...

कोरपना-नारंडा -भोयगाव-चंद्रपूर बस सेवा सुरू करा : भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची मागणी

By : Shankar Tadas
कोरपना : नारंडा -भोयगाव -चंद्रपूर बससेवा सुरू करण्यासंदर्भात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राजुर आगार प्रमुख यांना निवेदन दिले.

सदर बससेवा सुरू झाल्यास कोरपणा तालुक्यातील कोडशी बु, कोडशी खुर्द,गांधीनगर, हेटी, शेरज बू, शेरज खुर्द,माथा, लोणी,पिपरी,नारंडा, वनोजा, कढोली खुर्द, अंतरगाव, सांगोडा,हिरापूर, विरुर,गाडेगाव, बोरगाव, इरई,भारोसा,भोयेगाव इत्यादी गावातील नागरिकांना फायदा होईल.

कोरपना – नारंडा- चंद्रपूर बससेवा सुरू झाल्यास कोरपना तालुक्यातील नागरिकांना चंद्रपूरला जाण्यासाठी सोपा व सोयीचा होईल. सदर मार्गावर कोरोना पासून एकही बस सेवा सुरू नाही त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना राजुरा मार्गे फेरा घेऊन जावे लागत आहे.त्यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाया जात आहे, सदर बस सेवा सुरू व्हावी अशी परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक पासून मागणी होती.

सदर मागणीची दखल घेत चंद्रपूर वरून नारंडा मार्गे कोरपनासाठी सकाळी ८.३० वाजता व सायंकाळी ५.०० वाजता व कोरपनावरून नारंडा मार्गे सकाळी १०.३० वाजता बस सेवा सुरू करण्यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगर प्रमुख यांना निवेदन देऊन सदर बस सेवा सुरू करण्यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केली. आपण लवकरात लवकर सदर बससेवा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करू अशी आश्वासन राजुरा आगार प्रमुख यांचे मार्फत देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here