Home
Home गडचांदूर / कोरपणा कोरपना येथे सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

कोरपना येथे सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

लोकदर्शन 👉मोहन भारती

कोरपना :– महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते मोठय़ा उत्साहात करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, प्रचंड वेगाने वाढत असलेली महागाई आटोक्यात आणण्यासाठी, शेतमालांचे कोसळलेले भाव उंचावण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी, मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्राचा स्वाभिमान शाबुत ठेवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी चे सर्वाधिक आमदार आणि सरकार निवडून आनणे हीच आपली प्राथमिकता असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे आणि जनसामान्यांना आपल्या कारकीर्दीत पुर्ण झालेली विकासकामे, गोरगरिबांना झालेली मदत कामे समजावून सांगितले पाहिजे असे सांगितले. तसेच यावेळी आ. सुभाष धोटे यांनी सर्वांना सोबत घेऊन कोरपना शहरातील मार्केट व्यापारी व नागरिकांच्या भेटी घेऊन आपल्याच पून्हा सेवेची संधी द्यावी अशी साद घातली.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, नगराध्यक्षा नंदाताई बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, शिवसेना उभाठा चे तालुकाध्यक्ष डॉ. प्रकाश खनके, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नथ्थु लोढे, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, दिनकर मालेकर, सुरेश मालेकर, नितीन बावणे, प्रा. आशिष देरकर, संजय जाधव, आनंदराव मोहुर्ले, भाऊराव बोरडे, मच्छिंद्र मानकर, भगवान हरबडे, विनोद नवले, तुळशीराम टेकाम, राजाबाबु गलगट, गणपत कुडमेथे, इरफान शेख, भाऊराव चव्हाण, ज्ञानेश्वर आवारी, गणेश गोडे, शैलेश लोखंडे, उमेश राजूरकर, प्रेम बोंडे, रमेश बोरडे, रोशन मरापे, सुनील कोहचाळे, सुरज भोयर, प्रकाश डाहुले, चंद्रभान क्षिरसागर, संतोष भोयर, मोईन बेग, अंकुश वांढरे यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here